अनुष्काबाबत अनुदगार : सुनील गावस्कर ट्रोल

मुंबई । आयपीएलच्या सामन्यात विराटच्या सुमार कामगिरीबाबत भाष्य करतांना त्याची पत्नी अनुष्काबाबत अनुदगार काढल्याने सुनील गावस्कर यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करताना माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांची बोलताना जीभ घसरली. गावसकारांनी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. अनुष्का आणि विराटबद्दल केलेल्या त्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गावसकरांना सोशल मीडियात ट्रोल करण्यात आले आहे.

काल रात्री झालेल्या सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला. क्षेत्ररक्षणावेळी राहुलचे दोन झेल सोडले तर फलंदाजी करताना अपयशी ठरला. कोहली फक्त एक धाव काढून शेल्डन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो बाद होऊन माघारी परतताना भारताचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील समालोचक सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. गावसकर म्हणाले की, “Inhone lockdown me to bas Anushka ki gendon ki practice ki hain”

या आक्षेपार्ह विधानावर अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. नेटकर्‍यांनी गावसकरांवर टीका केली आहे. महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या गावसकरांना समालोचनावर काढून टाकवे असं वक्तव्य काही नेटकर्‍यांनी केलं आहे.

Protected Content