काँग्रेसचा प्रचार करण्याची उर्मिला मातोंडकर यांना विनंती

urmila

मुंबई, वृत्तसंस्था | विधानसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसच्या प्रचारासाठी मैदानात उतरावे, अशी विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा काँग्रेसला उर्मिला मातोंडकर यांनी आठवण झाली आहे.

 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी स्वतः उर्मिला मातोंडकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी उर्मिला मातोंडकरांना विधानसभा प्रचारासाठी येण्याची गळ घातली असेही समजते आहे. यासंदर्भात उर्मिला मातोंडकर येत्या दोन दिवसात त्यांचा निर्णय कळवणार आहेत असे कळले आहे. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मुंबई शहर काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळाले नाही, असा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला होता. आता पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या उर्मिला मातोंडकर या पुन्हा काँग्रेसचा प्रचार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Protected Content