अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पाडळसरे येथील तापी नदीवर अपूर्णावस्थेत असलेल्या पाडळसरे धरणाच्या कामाला पुन्हा जोमाने गती देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी कामाची पाहणी केली आहे.
दरम्यान, कामासाठी लागणारी वाळू, मुरूम, दगड आदींच्या उत्खननास परवानगी देण्याआधी पाडळसरे धरणाच्या कामाची स्थिती व मागणी करण्यात आलेल्या ठिकाणी उपलब्ध होणारे गौण खनिज याची पळताळणीच्या पाहणीसाठी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाराज, जिल्हा खनिकर्म अधिकारी दिपक चव्हाण, नायब तहसीलदार योगेश पवार, पाडळसरे धरणाचे उपविभागीय अभियंता वैभव वडगावकर, धरणाचे शाखा अभियंता ऋतूल सोनवणे यांचा टीमने दि.२४ रोजी दुपारी कळमसरे, तांदळी, बोरगाव, डांगरी येथील पांझरा-बोरी नदीच्या पात्रात पाहणीचे चित्रण करून सायंकाळी पाडळसरे धरणस्थळी झालेले प्रत्यक्ष काम, साठवून ठेवलेले गौण खनिज आदींबाबत माहिती घेऊन नवीन पाडळसरे पुनर्वसन गावठाणात नागरी सुविधांची पाहणी केली.
यावेळी ग्रामपंचायत तर्फे अपूर्ण शिवरस्ते व अपूर्ण नागरी सुविधांपूर्ण करण्यासाठी निवेदन सादर केले व यामुळे पावसाळ्यापासून बंद असलेल्या पाडळसरे धरणाच्या कामाला गती प्राप्त होणार असल्याने त्या बाबत हालचालींना वेग आला आहे.
पाडळसरे धरणाचे कामाला भविष्यात लागणारे गौण खनिज बांधकाम विभागाच्या गुणवत्ता परीक्षण शाखेच्या मान्यता मिळालेल्या वाळू, माती बांधकाम साठी मुरूम व खळी निर्मितीसाठी शिफारस केलेला दगडाचे उत्खनन व वाहतूक करण्यासाठी परवानगी कार्यकारी अभियंताकडून करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष धरणाच्या कामाला लागणारे गौण खनिज किती व कुठे उपलब्ध होऊन किती महसूल गौण खनिजच्या माध्यमातून शासनाला प्राप्त होईल याचे स्थळ निरीक्षक व पाहणीसाठी नाशिक आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा खनिकर्म अधिकारी दिपक चव्हाण यांच्या सोबत नायब तहसीलदार योगेश पवार, उपविभागीय अभियंता वैभव वडगावकर, शाखा अभियंता ऋतूत सोनवणे, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, पाडळसरेचे तलाठी जितेंद्र जोगी कळमसरेचे व तांदळीचे तलाठी गौरव शिरसाट, ग्रामसेवक सुभाष भोई यांच्या टीमने दिवसभर अमळनेर तालुक्यातील बोरी नदीवरील डांगरी ,बोरगाव व पांझरा नदीवरील तांदळी या ठिकाणी वाळूच्या उपलब्धता बाबत पाहणी करून कळमसरे येथे रामनाम पाझर तलाव शेजारील मरूमची पाहणी करून शेवटी सायंकाळी पाडळसरे धरणस्थळी भेट देऊन साठवून ठेवलेली वाळू, खडी, दगडाची पाहणी करून दोन वर्ष कामाला लागणारे गौण खनिजचा अहवाल तयार करण्याआधी स्थळ निरीक्षक केले.