आधारकार्ड अपडेट करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भारत सरकारकडील १९ सप्टेबर २०२२  च्या अधिसुचनेनुसार, ज्या व्यक्तींना आधार कार्ड काढुन १० वर्षे पूर्ण झाली असल्यास त्यांनी आपले आधार कार्ड अदयावत करणे गरजेचे आहे.  केंद्र व राज्य शासनाच्या अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारचा वापर केला जात आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नवीनतम आणि अद्ययावत तपशीलांसह आधार सादर करणे आवश्यक आहे.

 

ज्यांना आधार कार्ड काढून १०  वर्षांहून अधिक काळ झालेला आहे. परंतु अदयावत केले नसतील, उदा –  पत्ता, मोबाईल क्रमांक इ. किंवा त्यांच्या लोकसंख्येच्या तपशीलात कोणताही बदल झालेला नाही अश रहिवाशांना आधार देणारी कागदपत्रे अपलोड करून त्यांचा पत्ता पुन्हा सत्यापित करणे आवश्यक आहे. त्यानुसार आधारधारकांना यासंदर्भात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉक्युमेंट अपडेट’ हे नवीन फीचर विकसित करण्यात आले आहे. नागरिक आधार अदयावत कोणत्याही आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन आधार अदयावत करू शकतात. जसे आपले सरकार सेवा केंद्र, सेंट्रल बँक, सीएससी सेंटर, बीएसएनएल कार्यालय या ठिकाणी अदयावत करु शकतील.

महिला व बालविकास विभागातंर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीमध्ये करण्यात येत आहे. हि नोंदणी निशुल्क आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कायमस्वरुपी एक आधार संच बसविण्यांत आला असुन, त्या ठिकाणी नागरिकांना आधार कार्ड अदयावत करता येतील. आधार कार्ड अदयावत करणेकरीता शासनाकडील निश्चित करण्यांत आलेल्या दरानुसार शुल्क आकारले जाईल. तरी सदर योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन, जिल्हाधिकारी अमन मित्तल,  यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केलेआहे. अधिक माहितीकरीता १९४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Protected Content