कारण नसतांना तरूणावर चाकूहल्ला; मारेकरी झाले फरार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एम.जे.कॉलेजजवळील क्राऊन बेकरीसमोर काहीही कारण नसतांना तरूणाला मारहाण करत चाकूने वार करून जखमी केल्याची घटना बुधवारी ८ मे रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ९ मे रोजी पहाटे ४ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोकेश विजयसिंग राजपूत वय १९ रा. आशाबाबा नगर, जळगाव हा तरूण कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवार ८ मे रोजी सकाळी ७ वाजता लोकश हा एम.जे.कॉलेजजवळील क्राऊन बेकरीसमोर उभा असतांना काहीही कारण नसतांना कल्पेश पाटीलसह त्यांच्या भाऊ आणि इतर मुलांनी (पुर्ण नाव माहित नाही) यानी लोकेशला शिवीगाळ करत चाकूने वार करून गालावर व पोटावर दुखापत केली. जखमी झालेल्या लोकेशला शासकीय वैद्यकीय महाविद्याालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी ९ मे रोजी पहाटे ४ वाजता रामानंद नगर पोलीसात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार कल्पेश पाटीलसह त्यांच्या भाऊ आणि इतर मुलांनी (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.

Protected Content