पैशांवरून तरूणाच्या डोक्यात टाकला लोखंडी पाईप

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जलाला शहा बाबा दर्गाजवळ उसनवारीने दिलेले पैशांपैकी उरलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून तरूणाच्या डोक्यात लोखंडी पाईट टाकून जखमी केल्याची घटना ४ मे रोजी रात्री १२.३० वाजता घडली होती. याप्रकरणी अखेर चौकशी अंती गुरूवार ९ मे रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, इमरान शेख गुलाम रसुल वय ३५ रा. जलाल शहाबाबा दर्गा, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. इमरान शेख याने सोमेश सोनवणे याला उसनवारीने चाळीसहजार उसनवारीने दिले होते. ४ मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजता इमरान शेख याने ४० हजार पैकी ५ हजार रूपये परत करण्याचे सोमेश सोनवणे याला सांगितले. याचा राग आल्याने सोमेश सोनवणे, किशन पंचरवाला, संतोष सोनवणे, कुणाल सोनवणे, प्रताप सुरवाडे, निलेश पारधे, जितू कैलास करोशिया सर्व रा. भुसावळ यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर एकान लोखंडी पाईपाने मारहाण करून जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर जखमी इमरान याला भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर इमरान शेख याने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुरूवारी ९ मे रोजी सकाळी ११ वाजता मारहाण करणारे सोमेश सोनवणे, किशन पंचरवाला, संतोष सोनवणे, कुणाल सोनवणे, प्रताप सुरवाडे, निलेश पारधे, जितू कैलास करोशिया सर्व रा. भुसावळ यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे हे करीत आहे.

Protected Content