भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत हायमस्ट लाईट खंब्याचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील द्वारका नगरातील निमखेडी रोडवर भरधाव कंटेनरने महापालिकेच्या हायमास्ट लाईटच्या खंब्याला जोरदार धडक दिल्याने खाली पडून २० हजाराचे नुकसान केल्याची घटना बुधवारी २ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चालक कुलदिपसिंग राजकुमार ब्राम्ह रा. हरीयाणा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील द्वारका नगरातील निमखेडी रोडवर महापालिकेच्या वतीने हायमस्ट लाईट लावण्यात आला आहे. बुधवारी २ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कंटेनर क्रमांक (एनएल ०१ एए ७१३०) वरील चालकाने परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून महापालिकेच्या हायमस्ट लाईटच्या खंब्याला जोरदार धडक दिली. यामुळे लाईचा खंबा खाला पडून २० हजारांचे नुकसान केले आहे. याप्रकरणी सुमित रविंद्र पाटील रा. शनीपेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक कुलदिपसिंग राजकुमार ब्राम्ह रा. हरीयाणा याच्यावर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे हे करीत आहे.

Protected Content