जळगाव प्रतिनिधी । येथील सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. त्यात पुढील तीन वर्ष मुदतीसाठी अध्यक्ष म्हणून रत्नाकर पांढरकर यांची तर कार्याध्यक्ष म्हणून बंडू खंडारे सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सभासद म्हणून जनार्दन माळी, मिठाराम म्हसकर, डॉक्टर प्रमोद आमोदकर, राजेश्वर धर्माधिकारी, जितेंद्र महाजन, एडवोकेट प्रदीप देशपांडे, जितेंद्र पाटील ,संजय पाटील, डॉक्टर नजरूल इस्लाम के अहमद, हरीश पाटील, मनोज नाईक यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीसाठी, विकासासाठी तसेच वाचनसमृद्धी वाढविण्यासाठी जनजागृती करण्याचा सर्वांनी मनोदय व्यक्त केला, संस्थेचे मावळते कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ.युवराज वाणी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वाचनालयाचे जुने-जाणते लेखनिक म्हणून काम पाहणारे न्यू इंग्लिश स्कूलचे पर्यवेक्षक बी. आर. खंडारे सर यांनी कार्याध्यक्षपद सांभाळावे अशी आग्रही भूमिका मांडली होती. त्यानुसार सर्वांनी एकमताने त्यांची निवड केली.
संस्थेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या सभेत शोकप्रस्ताव, मागील सभेच्या कार्य वृत्तांतास मंजुरी, वार्षिक जमाखर्च, आगामी अंदाजपत्रक, वार्षिक अहवाल या विषयांसह अनेक विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.