जळगावात ट्रक चालकाला लुटणारे दोघे संशयित अटकेत

jail11 2017071030

जळगाव प्रतिनिधी । आजिंठा चौकात महामार्गावर थांबलेल्या ट्रकचालकाला मारहाण करून चाकूचा धाक दाखवत लुट करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शाहरूख शेख मुनिर शेख (वय-22) रा. मुल्ला कॉलनी चाळीसगा रोड धुळे हा ट्रक चालक असून 15 जानेवारी रोजी रात्री ट्रक क्रमांक एमएच 16/एई 65 मधील भारत सर्कसचा सामान खाली करून अजिंठा चौफुलीजवळील हॉटेल मानसजवळ ट्रकसह थांबला होता. यावेळी अज्ञात दोन जण जवळ येवून त्यांनी चाकूचा धाक दाखवत शाहरूखला मारहाण करण्यास सुरूवात केली व पॅटच्या खिश्यातील 13 हजार रूपये रोख जबरदस्तीने काढून घेतले. चालकास मारहाण करून दुचाकीवर दोघे फरार झाले होते. ट्रक चालक शाहरुख शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही संशयितांना गेंदालाल मिल, शिवाजीनगरातून ताब्यात घेतले आहे. मयुर हेमसिंग पाल (वय-20) आणि संदीप मधुकर निकम (वय-22) दोन्ही रा. गेंदालाल मिल अशी दोन्ही संशयित आरोपींची नावे आहे. सहाय्यक फौजदार रामकृष्‍ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, विजय पाटील, सचिन चौधरी, सचिन पाटील, सतीश गरजे, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, आसीम तडवी अशांनी कारवाई केली. दरम्यान दोन्ही आरोपींना आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Protected Content