यावल येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

यावल प्रतिनिधी | येथील शहराजवळील श्री व्यास मंदिराजवळील स्मशानभूमीच्या मागील बाजूस ट्रॅक्टरद्वारे विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले असून ट्रॅक्टर यावल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात महसुल प्रशासनाच्या वतीने मिळालेली माहिती अशी की, आज (दि.२९ जानेवारी) रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास यावल येथील शहरातगतच्या श्री व्यास मंदीर परिसरातील हिन्दु स्मशानभुमीच्या मागील बाजुस मार्गावरून स्वराज्य कंपनीचे निळया रंगाचे ७४४ एफई मॉडेलच्या विना क्रमांकाचे धुळ असलेल्या वाहनातुन वाळुची वाहतुक करतांना आढळुन आले. महसुलच्या पथकाने सदरचे ट्रॅक्टर वाहन थांबवुन वाहनाची तपासणी केली असता त्यात अर्धा ब्रास वाळु आढळुन आली. याबाबत सदरच्या ट्रॅक्टरवरील चालक संजय भगवान भोई राहणार बोरावल गेट जवळ यावल याच्याकडे विचारणा केली असता वाळु वाहतुकीचा परवाना नसल्याची माहीती मिळुन आली.

यावेळी महसुल पथकातील फैजपुर विभागाचे मंडळ अधिकारी एम. एच. तडवी, परसाडे तलाठी समिर तडवी, यावल शहर तलाठी ईश्वर कोळी, डोंगर कठोरा तलाठी, अंजाळे येथील तलाठी शरद सुर्यवंशी व टाकरखेडा तलाठी उमेश बाभुळ्कर, डोंगर कठोरा तलाठी वसीम तडवी यांच्या पथकाने केलेल्या कारवाई अवैध वाळुची वाहतुक करणारे ट्रॅक्टर ३ लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर व २५ हजार रूपये किमतीचे धुळ व १ हजार ५०० रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळु असे ३ लाख२६ ह्जार रुपये किमतीचे वाहनासह धुळ जप्त केले असुन, सदरचे वाहन हे यावल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असुन यावल पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content