यावल येथे सैन्यातील वरिष्ठ हवालदार यादव यांच्या सत्काराचे आयोजन

1de6ed85 9386 4ae2 99db e968ace75b53

यावल, प्रतिनिधी | येथील शिवाजीनगर मधील रहिवासी अमोल निळकंठ यादव हे भारतीय सेनेतील आपल्या १८ वर्षांच्या सेवेनंतर दिनांक ३१ जुलै रोजी वरिष्ठ हवलदार या पदावरून सेवानिवृत होत आहेत. त्यांच्या सत्कार सोहळ्याचे २ ऑगस्ट रोजी येथे आयोजन करण्यात आले आहे.

 

अमोल यादव हे सन २००० मध्ये भारतीय सैन्यात रुजु झाले होते, त्यांनी आपल्या १८ वर्षांच्या देशसेवेत जम्मु-काश्मिर, लेह-लद्दाख, अमृतसर, अम्बाला, झांसी आदी ठिकाणी सेवा बजावली. येथील त्यांच्या निवासस्थानी शिवाजीनगर येथे एका कौटुंबीक कार्यक्रमात त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील आणि नगरसेवक प्रा. मुकेश येवले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित दिनांक २ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.

Protected Content