रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर येथील तडवी कॉलनीतील एका घरात घराचा कडी कोंडा तोडून सोन्याचे दागिने व चोरट्यांनी रोख रकमेसह ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/advt-1.jpg)
याबाबतचे वृत्त असे की तडवी कॉलनीत राहणारे मुनाफ गंभीर तडवी हे बाहेरगावी गेले होते .बंद घर असल्याची संधी साधून चोरटयांनी घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातून अंगठी, सोन्याचेमणी व ५ हजार रुपये रोख असा ६६ हजार ४०८ रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत मुनाफ तडवी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती वरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल ईश्वर चव्हाण करीत आहेत.