केंद्रीय मंत्री दानवे यांच्या वक्तव्याचा भडगावात निषेध; तहसीलदारांना निवेदन

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाविषयी अपशब्द वापरुन नाभिक समाजाची बदनामी केली यांच्या निषेध व्यक्त करत नाभिक समाजाची माफी मागावी, अशी मागणीचे निवेदन येथील श्री. संत सेना महाराज नाभिक समाज मंडळाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष ना. रावसाहेब दानवे यांनी जालना येथे एका कार्यक्रमात आघाडी सरकारवर टीका करताना नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून नाभिक समाजाचा अपमान केला आहे. राजकीय नेते, पदाधिकारी बहुजन समाज आपली जहांगीर आहेत असे समजुन उदाहरण देतात. यापुर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यानी बहुजन समुहातील नाभिक समाजाचा निंदनीय शब्दात अपमान केला होता.

 

यामुळे संपूर्ण राज्यातील नाभिक समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून आपण त्यांचा राजीनामा घ्यावा अथवा त्यांनी समाजाची केलेल्या बदनामी बद्दल जाहिर माफी मागावी अन्यथा संपूर्ण राज्यातील नाभिक समाजासह बहुजन समाज आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. जर या पासून राज्यात कुठलीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील. असा निवेदनातील मचकुर आहे.

 

यावेळी नाभिक समाज अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, खजिनदार विजय दामु ठाकरे, जिल्हा सरचिटणिस रविद्र शिरसाठ, कार्यकारणी सदस्य काशिनाथ शिरसाठ, सुभाष ठाकरे, राजीव महाले, अॕड. भरत ठाकरे, निलेश महाले, प्रभाकर नेरपगारे, गोरख वेळीस, दयाराम ठाकरे, नारायण नेरपगारे, दिपक शिरसाठ, लक्ष्मण ठाकरे, ज्ञानेश्वर महाले, रविद्र न्हावी, दत्तात्रय शिरसाठ, सुरेश पवार सह नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content