देशातील कोणत्याही गरीब व्यक्तीला मुलभूत गरजांसाठी कोणावरही विसंबून राहण्याची गरज नाही : अ‍ॅड. संदिपभैय्या पाटील

जळगाव (प्रतिनिधी) छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर कर्जमाफीबाबत राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तीनही राज्यात सरकार आल्याच्या अवघ्या 48 तासांच्याआत शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिपभैय्या पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, महानगराध्यक्ष जळगाव जिल्हा डॉ. राधेश्याम चौधरी, डी.जी. पाटील, माजी महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, अ‍ॅड. अविनाश भालेराव, राजस कोतवाल आदी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर संपूर्ण देशात गरिबांसाठी किमान उत्पन्न योजना राबविण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली असून या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाल्यावर देशातील एकाही गरीब व्यक्तीला आपल्या मुलभूत गरजांसाठी कोणावरही विसंबून राहण्याची गरज नसल्याचे अ‍ॅड. संदिपभैय्या पाटील यांनी सांगितले. भाजपकडून निवडणुकीत दिली जाणारी आश्वासन आणि र्कॉग्रेसकडून दिला जाणारा शब्द यात मुलभूत फरक असून काँग्रेस शब्द पाळते तर भाजप शब्द फिरवत असते,अशी टिका त्यांनी यावेळी केली. कॉग्रसचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक गरीबाला किमान वेतन देण्यात येईल. भाजप सरकारच्या काळात कुपोषण आणि भूखबळीची समस्या गंभीर झाली आहे. तसेच देशात भूखबळींची संख्या वाढत असून भाजप सरकारच्या काळात कुपोषण आणि भूखबळीची समस्या गंभीर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content