यावल शहरात अज्ञात चोरट्यांनी फोडली चार बंद घरे

यावल प्रतिनिधी | येथील शहरातील विस्तारीत वसाहतीच्या क्षेत्रातील मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चार बंद असलेल्या घरांना लक्ष केले असून त्यातून रोख रक्कम आणि दगिने चोरीला गेले आहेत.

यावल शहरातील विस्तारीत वसाहतीच्या क्षेत्रातील पांडुरंग सराफ नगरात काल मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी चार बंद असलेल्या घरास लक्ष केलं असून , घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी यावलचे पोलीस पोहोचले आहेत. या प्रकारामुळे परिसरात विविध कामांसाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरीकांना अधिक सर्तक राहण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे .

यात वनविभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर सपकाळे, हमीद जबरा तडवी, पाल येथे वन विभाग सेवेत कार्यरत सारिका कदम, आकीब खान साबीर खान यांच्या घरांचा यात समावेश आहे. बाहेरगावी गेलेली मंडळी दुपारी आपल्या घरी आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

घटनेचे वृत्त कळताच यावलचे पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले हे तात्काळ घटनास्थळी पहोचले असून या चारही बंद असलेल्या घरात किती रुपयांची व दागिन्यांची चोरी झाली आहे हे तपासाअंती निष्पन्न होईल. या घरफोडीच्या घटनेमुळे नवीन वसाहतीमधील रहिवासी नागरीकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे .

Protected Content