जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे घरासमोर सुरू असलेल्या शेकोडीत आठ महिन्याचे चिमुकला पडून गंभीर भाजला गेल्याचे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना सोमवारी २० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियाने एकच अक्रोश केल्याचे दिसून आले. देवांशु सुनिल सोनवणे वय ८ रा. नांद्रा खुर्द ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द गावात सुनिल सोनवणे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ जानेवारी रोजी सायंकाळी शेकोटी लावण्यात आलेली होती. त्यावेळी देवांश हा खेळत असतांना तो शेकोटीत पडला. त्यामुळे तो गंभीररित्या भाजला गेला होता. त्याचे वडील सुनिल सोनवणे यांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी २० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.