दुदैवी घटना : उष्माघाताने खादगावचे माजी उपसरपंच यांचा मृत्यू

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील खादगाव येथील माजी उपसरपंच प्रमोद चौधरी वय ४० यांचा उष्मघातामुळे हृदयाचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी २२ मे रोजी दुपारी १ वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील खादगाव येथील माजी उपसरपंच प्रमोद चौधरी हे त्यांच्या शेतात पाहणी करण्यासाठी गेले होते. भर तापमानात घरी परतल्यानंतर त्यांनी थंडगार पाणी पिल्यानंतर अचानक त्यांना चक्कर आले. त्याच्या नाकातून रक्त आले असता तात्काळ जामनेर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अशातच त्यांना हृदयाचा तीव्र झटका आल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी,पत्नी,आई असा परिवार असून या घटनेमुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोगर कोसळला आहे.

Protected Content