आई शेतमजूर अन् पितृछत्र हरपलेले दोन्ही भाऊ झाले पीएसआय

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आई शेतमजूर आणि पितृछत्र हरपलेले जामनेर तालुक्यातील रोटवद येथील दोन्ही भाऊंनी खडतर प्रवास आणि मेहनतीसह जिद्दीने पीएसआय पदावर

कत्याच खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक ( PSI) पदाच्या परीक्षेचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निकाल जाहीर झाला आहे. यात जामनेर तालुक्यातील रोटवद गावचे सुपुत्र अमोल कडुबा देशमुख नंदुरबार पोलीस यांची PSI पदासाठी निवड झाली.

वयाच्या आठव्या वर्षीच पितृछत्र हरवले अशा या संकटात सापडलेल्या परिवाराला आधार देण्यासाठी गावातील माजी पोलीस पाटील कै.लक्ष्मन भिका पाटील यांनी या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळली आणि यातील मोठा गोपाल देशमुख गडचिरोली जिल्ह्यात पोलीस झाल्यानंतर अमोल देशमुख देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दलात २०१३ मध्ये नियुक्त झाला. एका छोटयाशा गावामधील शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दोन्ही भाऊ पोलीस दलात भरती झाल्याने कुटुंबाची स्थिती पूर्ण बदलली. कालांतराने मोठा भाऊ स्पर्धा परीक्षा देऊन PSI झाला व तोच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन लहान भाऊ देखील या परीक्षेच्या माध्यमातून PSI झाला वडीलांचे निधन झाल्यानंतर शेतमजुरी करणाऱ्या आईच्या मुलांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळविले. विशेष दोन्ही भावांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेले. अमोल देशमुख यांनी कर्तव्याबरोबर समाजिक कार्यावर भर देत असताना आणि ग्रामीण भागातील मूल देखील पोलीस दलात नियुक्त व्हावेत, म्हणून जामनेर तालुक्यात विविध खेडे गावांमध्ये मोफत पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन शिबीर आयोजित केली आणि अजूनही घेत आहे.या शिबिराचा लाभ अनेक तरुणांनी घेतला व अजूनही घेत आहेत.

कोणत्याही यशामागे कुणाचा तरी हात असतोच तस आपल्या यशात कै. लक्ष्मण पाटील, आई, भाऊ, नातेवाईक, सासू सासरे, मित्र परिवार, नंदुरबार पोलीस दल, गुरुवर्य, वसंत तडवी, सारंग गवळी, रवींद्र भोई यांचा तर वाटा आहेच, पण माझ्याकडून सर्व तयारी करून घेणाऱ्या, मला सतत अभ्यासाला, ग्राउंडवर सरावासाठी वारंवार अट्टहास करून पाठवणाऱ्या आणी. या काळात माझी योग्य ती काळजी घेणाऱ्या माझ्या पत्नीचा खूप मोठा खारीचा वाटा असल्याचे मत अमोल देशमुख यांनी व्यक्त केले.

Protected Content