भुसावळात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात अंदाजे ४५ वर्षीय अनोखळी महिलेचा मृतदेह मयतस्थितीत आढळून आल्याची घटना मंगळवारी २१ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका मोकळ्या जागेत मंगळवारी २१ मे रोजी सकाळी ७ वाजता अंदाजे चाळीस वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने उचलून खासगी वाहनातून भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक सोपान पाटील हे करीत आहे.

Protected Content