बांग्लादेशच्या खासदाराची भारतात हत्या; ३ जणांना अटक

कोलकाता-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतामध्ये बेपत्ता झालेले बांगलादेशचे खासदार अनावरुल अजीम अनार यांची कोलकातामध्ये हत्या झाली आहे. बांगलादेशमधील सत्तारुढ आवामी लीगचे खासदार असलेल्या अनार यांची एका फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आलीय, अशी माहिती गृहमंत्री असदुज्ज्मां खान यांनी दिली. या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली आहे. गृहमंत्री खान यांनी सांगितलं की, ‘आम्हाला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हत्या प्रकरणात सहभागी असलेले सर्व आरोपी हे बांगलादेशी आहेत. ही ए सुनियोजीत हत्या होती. या हत्येच्या उद्देशाचा तपास सुरु असून लवकरच त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ, असं त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अनार उपचारासाठी 12 मे रोजी भारतामध्ये आले होते. उत्तर कोलकातामधल्या बरानगर पोलीस स्टेशनमध्ये 18 मे रोजी ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीन यांनी अनार यांच्या हत्येबाबत शोक व्यक्त केलाय. अनार जेनाइदह-4 मतदारसंघातले आवामी लीगचे खासदार होते. गृहमंत्री खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जेनाइदह हा सीमेवरचा प्रदेश आहे. त्या भागात अनेक गुन्हेगारी संघटना आहेत. अनार तेथील खासदार होते. ते उपचारासाठी भारतामध्ये आले होते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांची तिथं हत्या करण्यात आली आहे.

Protected Content