जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात महाबळ येथील २० वर्षीय वर्षीय तरुणीला झोक्याचा फास लागून गुदमरून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जुने जळगाव आतील ११ वर्षीय मुलाचा देखील झोक्याचा फास लागून गुदमरून मृत्यू झाल्याची घटना बुधवार ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंशू किरण माळी (वय-११) रा.बदाम गल्ली जुने, जळगाव असे मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंशू किरण माळी हा मुलगा जुने जळगाव येथील बदाम गल्लीत आई, लहान भाऊ व वडील यांच्यासह वास्तव्याला होता. वडील नासिक येथे कंपनीत नोकरीला आहे. तर आई मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार ७ डिसेंबर रोजी आई व वडील घरी नसतांना घराच्या वरच्या मजल्यावर अंशू हा लहान भावासोबत झोक्यावर खेळत होता. खेळताखेळता अचानक अंशूच्या गळ्यात झोक्याच्या दोरीचा फास लागल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना सायंकाही ६.३० काका घरी आले तेव्हा लक्षात आला. त्यांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या घटनेबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.