धरणगाव/जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडत असतांना अचानक रोटाव्हेटर सुरू झाल्याने ५९ वर्षीय शेतकऱ्याचा पाय अडकल्याने गंभीर जखमी झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यापुर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी नातेवाईकांनी एकाच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. रमेश सुखा कोळी वय ५९ रा. चांदसर ता.धरणगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे रमेश कोळी हे आपल्या पत्नी, दोन मुलं आणि सुना यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता चांदसर गावातील कृषी विद्यालयाच्या परिसरात ट्रॅक्टरला रोटाव्हेटर हे जोडत असतांना रमेश कोळी अचानक त्यांचा पाय मशीनीत अडकल्याने कंबरेपासूनचा खालचा भाग गंभीर जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून मयत घोषीत केले.या घटनेमुळे ।एलटीएन। गावात शोककळा पसरली आहे. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी हिराबाई, दोन मुलं नामदेव व वासुदेव आणि सुना नातवंडे असा परिवार आहे.