यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकीकडे दिवाळीचा आनंदोत्सव साजरा होत असतांना यावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील अविवाहित तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. किसन माणिक कंडारे (वय-३०) रा.डांभुर्णी ता.यावल असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किसन कंडारे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. २ नोव्हेंबर रविवार रोजी सर्वत्र दिवाळीचे आनंदमय वातावरणात असतांना तरूणाने आपल्या राहत्या घराच्या मागील बाजुस असलेल्या झाडावर दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे आत्महत्या करणारा तरूण हा ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांच्या कुटुंबातील मुलगा होता. मयत तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.प्रशांत जावळे व डॉ मयुर चौधरी यांनी केले .
यावल पोलीस ठाण्यात मयताचे पिता माणिक कंडारे यांनी खबर दिल्याने अक्सामात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे. तालुक्यात सर्वत्र मोठया प्रमाणावर हातभट्टीच्या दारूची सर्रासपणे विक्री होत असल्याने या दारूच्या आहारी जात अनेक तरूणांचे जिवन उद्धवस्थ होत आहे .