धावत्या रेल्वेखाली आल्याने महिलेचा मृत्यू

रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव लाईव्ह टेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल येथे माहेर असलेल्या विवाहितेने धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १२ वाजता सुमारास घडले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. योगिता सचिन भावसार (वय-४०) रा. वर्शी ता.जि.धुळे असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगिता भावसार या महिला रा. वर्शी ता.जि.धुळे येथे पती व दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या तब्येत खराब असल्यामुळे त्या जळगावतील माहेरी येथे आलेल्या होत्या. दरम्यान रविवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता त्या निघून गेल्या होत्या. त्यांनी अशाबाबा जवळील रेल्वे खंबा नंबर ४१७/८ जवळ धावत्या रेल्वेसमोर येवून आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. मृतदेहाचा पंचनामा केला सुरुवातीला मृतदेह अनोळखी होता. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून योगिता सचिन भावसार असे मयत महिलेचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. ओळख पटल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालात धाव घेवून एकच अक्रोश केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रवीण जगदाळे करीत आहे. मयत महिलेच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे.

Protected Content