युवकाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे वडिलांसोबात शेतात काम करीत असतांना सर्पदंशाने इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या युवकाचा दुर्दैवी  मृत्यू झाल्याची घटना दि. ४ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या  सुमारास घडली. गौरव सुनिल बडगुजर असे मृत तरुणाचे नाव आहे.

 

गौरव हा दि. २६ सप्टेंबर मंगळवार रोजी त्याच्या वडिलांसोबात शेतातील काम करण्यास गेला होता. काम करीत असतांनाच पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला.  गौरव हा  शेतात चक्कर येऊन पडला असता त्याच्या वडिलांनी त्यास पिंपळगाव (हरेश्वर) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. खाजगी रुग्णालयात आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असतांनाच दि. ४ आॅक्टोबर मंगळवार रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गौरव याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली व गौरवाचा दुर्दैवी मृत्यु झाला. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचा गौरव याच्या निधनाने पिंपळगाव (हरेश्र्वर) सह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Protected Content