कंपनीतून भंगार चोरणाऱ्या तिघांना अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वावडदा – म्हसावद रोडवरील प्लॉस्ट कंपनीतून १२ हजार रुपये किंमतीचे भंगार चोरुन नेणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. तिघांना गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की“वावडदा-म्हसावद रोडवरील श्री गुरुप्रभा पावर प्लॉस्ट कंपनी आहे. या कंपनी आवारात भंगार सामान तोडताड करुन ठेवलेला होता. सोमवारी, ११ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदरचा १२ हजार रुपये किंमतीचा सामान चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. प्रकार समोर आल्यानंतर कंपनीचे सुपरवायझर विजय श्रीरामधनी यादव (वय ३८) यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपी वावडदा येथील असल्याची गापेनिय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक स्वप्नील पाटील, हेमंत पाटील, होमगार्ड नितीन चिंचोले, मयूर सोनवणे यांनी वावडदा येथून संशयित आरोपी जगदीश कैलास गोपाळ (वय-२२), सुभाष रोहिदास गोपाळे (वय-३०) आणि दिपक गोपीचंद गोपाळ (वय-२२) तिघे रा. वावडदा ता.जि.जळगाव यांना सोमवारी ११ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता अटक केली. तिघांना न्यायालयात हजर केले असता गुरूवार, दि. १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content