रासायनिक खतांचा पुरवठा नियमित करा – खासदार उन्मेश पाटील

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा नियमितपणे होत नाही. त्याची तातडीने दखल घेवून नियमित करावा, ॲपच्या माध्यमातून पिक पेरा लावल्यानंतर पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून भरपाई देण्यात यावी. या  मागणीचे निवेदन खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना आज दिले.

आज मंगळवार, दि. १२ जुलै रोजी दुपारी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या दालनात भेट घेवून सध्याच्या परिस्थीतीत शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा केली. यावेळी कृषि उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उप संचालक कुरबान तडवी,भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी, माजी सरपंच रवींद्र पाटील, भरारी फाऊंडेशन अध्यक्ष दिपक परदेशी, मोहीम अधिकारी विजय पवार, पोखरा प्रकल्प समन्वयक संजय पवार आदींची उपस्थिती होती.

रासायनिक खत शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेमध्ये जादा दराने घ्यावे लागत आहेत. काही ठिकाणी खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. जळगाव जिल्ह्यात असलेल्या खतांचा बफर स्टॉक रिलीज करण्याबाबतची मागणी केली. प्रथम प्राधान्याने खत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व विविध कार्यकारी सहकारी संस्थांना उपलब्ध करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जळगाव जिल्हा मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, मका इ. पिकांकरिता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती अंदाजे २०० कोटी रुपये कधी नव्हती एवढी नुकसान भरपाई रक्कम सात्यत्याने केलेल्या पाठपुराव्याने मंजूर झाली होती. यावर्षी देखील सदरील योजनेत शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविता असून ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत उदा. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचा पेरा ई पिक पाहणी या ॲपमध्ये लावल्याची सक्ती न करता तलाठी यांनी लावलेले पीक पेरे देखील ग्राह्य धरावे. त्याचप्रमाणे महाडीबीटी व पोखरा योजनेला संबंधित मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्यापासून नवीन अनुदान मिळावे, अशी मागणी केली आहे.

Protected Content