बकरी चोरण्याच्या कारणावरून साईनगरात दोघांमध्ये हाणामारी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील साई नगरात बकऱ्या चोरण्याच्या कारणावरून दोन जणांमध्ये झोंबाझोंबी झाल्याचा प्रकार रविवारी ९ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता घडला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात एमआयडीसी दोघांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनगरात बाजीराव बाबासाहेब खामकर आणि अकीब याकूब पाटील हे दोघं आपापल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. रविवार ९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता बकरी चोरल्याच्या कारणावरून बाजीराव खामकर आणि अकिब पटेल यांच्यात शिवीगाळ व हाणामारी झाले. यामध्ये आपापसामध्ये बेदम मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान या संदर्भात दोघांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. दोघांच्या तक्रारीवरून परस्परविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

 

Protected Content