शेतात चक्कर येऊन पडल्याने वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू !

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील करमाड बुद्रुक येथील ६८ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत पारोळा पोलिसात रवींद्र भगवान पाटील यांनी खबर दिली की, अर्जुन भगवान पाटील (वय ६८) रा. करमाड बुद्रुक ता. पारोळा हे रविवारी ५ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास करमाड बुद्रुक शिवारातील शेतात काम करीत असतांना त्यांना अचानक चक्कर आले. सदर घटनेची माहिती कळताच त्यांना उपचारासाठी नातेवाईकांनी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता
वैद्यकीय अधिकारी यांनी यांनी तपासणी केल्यानंतर दुपारी 12:45 वाजता तपासून मयत घोषित केले. दरम्यान हा उन्हामुळे काम करत असताना ऊन लागल्यानंतर चक्कर आल्याचे समोर येत आहे.

हा उष्माघाताचा बळी आहे, की नाही हे अद्यापसमोर आलेले नाही. या घटनेबाबत पारोळा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील तपास करीत आहे.

Protected Content