सरपंच शारदा तांदुळकर यांच्यावर हल्ल्याप्रकरणी निवेदन

बोदवड प्रतिनिधी । निपाना ता.मोताळा येथील महिला सरपंच शारदा तांदुळकर या १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्त मंडळीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर कार्यक्रम टीव्ही वर बघत असतांना त्यांचेवर गावातील समाज कंटकांनी द्वेषातून त्यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी हल्लेखोरांवर कारवाई करण्याबाबत तालुका नाभिक महामंडळकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यांना शासकीय सामान्य रुग्णलयात भरती करण्यात आले आहे.महिला सरपंच या अल्पसंख्याक नाभिक समाजाच्या असल्यामुळे गावातील काही लोकांना ही बाब आवडली नाही यामुळे त्यांनी त्यांचेवर हल्ला केला. अशा हल्लेखोर लोकांवर कडक कारवाई केली जावी व नाभिक समाजाच्या महिला सरपंच ताईला न्याय मिळावा व शारदा तांदुळकर व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस सरंक्षण मिळावे अशा बाबीचे निवेदन आज देण्यात आले. न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र भर आंदोलन केले जाईल असा इशारा नाभिक संघटनेकडून देण्यात आला आहे. यावेळी बोदवड तालुका अध्यक्ष विवेक वखरे,सचिव गणेश सोनोने,जिल्हा कार्यध्यक्ष संजय वाघ ,राजेंद्र डापसे, शहराध्यक्षअनिल कळमकर,उपाध्यक्ष धनराज शेळके,जिल्हा प्रतिनिधी अमोल आमोदकर, योगेश वखरे, संतोष भागवत हे नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

 

Protected Content