शहरात वेगवेगळ्या दोन घटनेत महिलेसह तरूणी बेपत्ता; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेरावनगरातील ३० वर्षीय विवाहितेसह जागृती हौसिंग सोसायटीमधील २३ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडेराव नगर परिसरातील वंजारी गल्लीतील तुलसीबाई शाम राठोड (३०) या ६ ऑक्टोंबर रोजी साकळी १०.३० वाजेच्या सुमारास शौचास जावून येते असे सांगून घरातून निघून गेल्या. बराच वेळ झाला तरी त्या घरी न आल्याने त्यांचे पती शाम राठोड यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तरी देखील त्या आढळून न आल्याने त्यांना आपली पत्नी बेपत्ता झाल्याची खात्री झाली. शाम राठोड यांनी ७ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत हरविल्याची तक्रार दिली असून त्यांनुसार त्यांची पत्नी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

२३ वर्षीय तरुणी बेपत्ता
शहरातील जागृती हौसिंग सोसायटी परिसरातील प्रतिक्षा जितेंद्र कोळी (२३) ही तरुणी घरातून काहीच न सांगता निघून गेली. याप्रकरणी तीचे वडील जितेंद्र अभिमान कोळी यांच्या खबरीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content