चोपड्यात भरदिवसा स्प्रे मारुन दोघांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला

jail11 2017071030

चोपडा प्रतिनिधी – शहरातील जुन्या चोपडा शिरपूर रस्त्यावरील महावीर सुपर शॉप समोरील साई विहार अपारमेन्टमध्ये घरात घुसून महाविद्यालयीन तरुण तरुणी यांनी घरातील महिलेच्या तोंडावर मिरची स्प्रे मारून धक्काबुक्की करत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली. दरम्यान पळून जाण्याच्या तयारीत असतांना दोघांना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहेृ

याबाबत माहिती अशी की, शहरातील जुन्या शिरपूर रस्त्यावरील शिव कॉलनी परीसरातील महावीर सुपर शॉप समोरील अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर वरील प्लॉटमध्ये दिया गॅस एजन्सीचे मालक नितीन रामभाऊ पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात. गुरूवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक 22 वर्षीय तरुण शाळेच्या कामानिमित्त आलो आहेत. आबा (नितीन पाटील यांना आबा म्हणतात) आहेत का? अशी विचारणा त्याने घरी असलेल्या वैशाली पाटील यांच्या कडे केली. ते घरी नाहीत कामानिमित्त बाहेर आहेत असे, वैशाली पाटील यांनी सांगितले.

नंतर थोड्याच वेळात एक महाविद्यालयीन तरुणीने दरवाजा ठोठावला. वैशाली पाटील यांनी दरवाजा उघडला समोर एक 20 वर्षीय तरुणी होती. दरवाज्यातून आलेल्या मुलाने देखील खिशातून मिरची स्प्रे वैशाली पाटील यांच्या चेहऱ्यावर मारला हे घडत असताना ते चोरचोर असे ओरडत होत्या व त्यांनी चोरट्यांनी कॉलर आपल्या हातात पकडली असतांना त्यांनी वैशाली पाटील यांना मारहाण केली. या झटापटीत वैशाली पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची मण्याची माल तुटून पडली आहे. यावेळी आईने केलेली आरडाओरडा पाहून घरात असलेला मुलगा प्रणित व घरात काम करणारी महिला लताबाई पाटील धावत येऊन त्यांनी चोरट्यांना लाथाबुक्या मारल्या व सुटका करण्याचा प्रयत्न केला. हे करीत असताना तरुणीने लताबाईला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्या तावडीत न सापडता लताबाईनी मागच्या गॅलरीतून जाऊन खिडकीतुन रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या कडे मदतीची याचना केली. दोघेजण मोटरसायकलने धूम ठोकणार असतांना खाली उभे असलेल्या महेश (भैय्या)पवार, गोपाल महाजन तसेच खाली उभे असलेल्या लोकांनी त्यांना शिताफीने पकडून पोलीस स्टेशनला फोन लावून घटनेची खबर दिली. चोरीसाठी पूर्वनियोजित प्लॅन: घटनांतर वैशाली पाटील यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर त्यानी संशयीत गिरीश सपकाळे याला ओळखले. वैशाली पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी गिरीश रवींद्र सपकाळे (रा आहुजा नगर जळगाव) गायत्री हेमंत कोळी (रा गायत्री नगर जळगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक स्वप्निल उनवणे हे करीत आहेत.

Protected Content