Home Cities जळगाव डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन


nmu new

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ.आंबेडकर विचारधारा व सामाजिकशास्त्र प्रशाळेच्यावतीने ६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भाषा अभ्यासप्रशाळा व संशोधन केंद्रांचे संचालक, प्रा.डॉ.म.सु.पगारे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेचे संचालक तथा डॉ.आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.अनिल डोंगरे राहणार आहेत. सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या ग्रंथालय हॉलमध्ये सकाळी १० वाजता व्याख्यान होणार आहे. असे डॉ.आंबेडकर विचारधारा विभागाचे सहाय्यक प्रा.विजय घोरपडे, हर्षल पाटील यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound