Home क्राईम देवबाग खाडीत नौका पलटली ; आठ पर्यटकांना वाचविण्यात यश

देवबाग खाडीत नौका पलटली ; आठ पर्यटकांना वाचविण्यात यश


water

सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) मालवण तालुक्यातील देवबाग संगम खाडीपात्रात नौकाविहार करत असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक नौका कलंडून नौकेतील पाण्यात फेकले गेलेल्या ९ पर्यटकांपैकी ८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर एका महिलेचा मात्र, या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

कल्याण परिसरातील पर्यटकांचा ग्रुप देवबाग येथे आला होता. आज दुपारी नौकाविहार करत असतानाच साडेबारा वाजताच्या सुमारास ही पर्यटक नौका सोसाट्याचा वाऱ्यामुळे एका बाजूला कलंडली आणि नौकेतील ९ पर्यटक खाडीपात्रात पडले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक मच्छिमारांनी प्रसंगावधान दाखवत पाण्यात बुडालेल्या सर्व पर्यटकांना बाहेर काढले. या सर्वांना तातडीने मालवणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारापूर्वीच माया माने या वृद्धेचा मृत्यू झाला.


Protected Content

Play sound