प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेअंतर्गत ‘बीज भांडवल वाटप कार्यक्रम संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महानगरपालिका जळगाव येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत ‘बीज भांडवल वाटप कार्यक्रम आज संपन्न झाला.

आज गुरुवार, दि.२६ मे रोजी शहरातील म.न.पा.प्रशासकीय इमारत २, मजला येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमात १८ महिला बचत गटांना अन्न प्रक्रिया उद्योगाकरिता रु ६२,५०,०००/- लक्ष कर्ज स्वरुपात वितरीत करण्यात आले; तसेच प्रत्येक बचत गटाला चेक देण्यात येऊन महिलांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर जयश्री महाजन यांनी भुषविले. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त शाम गोसावी उपस्थित होते. जळगाव शहर स्तर संघाच्या अध्यक्ष विजयाताई देवरे व अनिता जगताप, रजनी सोनवणे, आशा सपकाळे, रत्ना पाटील, नवजीवन शॉपीचे कांकरीया व कृषी विभागाचे सचिन धुमाळ आदी. उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन समुदाय संघटक आशा चौधरी यांनी तर प्रास्ताविक शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांनी महिलांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग (PMFME) या विषयावर मार्गदर्शन करून महिलांनी स्वत: सक्षम होणे करिता आपल्या पायावर उभे राहावे व उद्योग व्यवसाय वाढवावा. खाद्य पदार्थ चांगल्या दर्जाचे बनवुन त्यांना चांगली बाजारपेठ निर्माण करावी असे सर्व प्रमुख पाहुण्यांनी महिलांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतिरिक्त आयुक्त शाम गोसावी, DAY-NULM विभाग प्रमुख शालिग्राम लहासे आणि शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी आशा चौधरी, अमोल भालेराव, अब्बास तडवी, राहुल बडगुजर कविता जाधव, शितल कंखरे, राजेश गडकर, नितीन जोशी, सुनंदा फडके, सुरेखा पाटील, भाऊलाल ठाकरे, हिरामण सपकाळे यांनी परिश्रम घेतले. प्रमुख पाहुणे व शहर स्तर संघ आणि वस्तीस्तर संघ व महिला बचत गटांच्या महिलांचे आभार शालिग्राम लहासे मानले.

 

Protected Content