मसाकाच्या सेवानिवृत्त कामगारांना मिळणार भविष्य निर्वाह निधीचे साडेतीन कोटी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मधुकर सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी साडेतीन कोटी रुपये टाकण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्वाधिक गाळप क्षमतेच्या आधारावर साखरच्या उत्पादनात अग्रभागी असलेला उत्कृष्ठ अशा न्हावी तालुका यावल येथील मधुकर सहकारी साखर कारखाना हा राजकीय व आर्थिक स्वार्थाचा बळी पडल्याने कारखाना अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे.

कारखाना बंद पडल्यामुळे तालुक्यातील अनेक उस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे शेकडो कर्मचारी व कामगार यांची आर्थिक परिस्थिती ही दयानिय असून याच पार्श्वभूमीवर मनसेच्या प्रमुख पदाधिकारी यांनी आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व मधुकर साखर कारखान्याचे युनियन कामगार यांना बोलावून घेतलेल्या बैठकीत कामगारांच्या हितासाठी निर्णय घेण्याचे ठरवले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी मधुकर साखर कारखाना समोर उपोषणास बसले होते त्या अनुषंगाने कामगारांच्या काही मागण्या होत्या त्यातल्या दोन मागण्या चर्चअंती जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर व जिल्हा बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर देशमुख हे चर्चेत सहभागी होते. कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी साडेतीन कोटी रुपये टाकण्यात येणार आहे. असे त्यांनी आश्वासन दिले. त्यावर प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात येतील व लवकरच निविदा प्रक्रिया काढून साखर कारखाना चालू करण्याच्या मार्गावर ती हालचाली वेगाने सुरू असून कामगारांना पूर्ण न्याय दिला जाईल. असे बैकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी सांगितले.

या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित जिल्हा संघटक चेतन अढळकर, उपजिल्हा संघटक अजय तायडे, तालुका संघटक किशोर नन्नवरे, मधुकर साखर कारखानाचे युनियन अध्यक्ष सुनील कोलते व इतर कामगार उपस्थित होते.

यात कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाला न्याय मिळवून देण्यात यश आले असून सर्व सेवानिवृत्त कामगारांनी मनसेचे आभार मानले.

Protected Content