राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजनेंतर्गत केशरी कार्ड धारकांनाही सवलतीच्या दरात मिळणार धान्य

यावल प्रतिनिधी ।  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत तालुक्यातील पुर्वी समाविष्ठ न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रक धारकांना माहे जुन २१ जून २०२१ पासून सवलतीच्या दरात धान्य मिळणार आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावलचे तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे.

 मागील दिड वर्षापासुन सुरू असलेल्या कोराना संसर्गाच्या पार्श्श्वभुमीवर पिवळया रेशन कार्ड धारकांना धान्य मिळायचे आता माहे२१ जुन पासून २३५७५ कार्डधारकातील १ लाख२३९७५ नागरीकांना या योजनेद्वारे लाभ मिळणार असुन , आता केशरी शिधापत्रिका कार्डधारकांना देखील प्रती माह प्रती व्यक्ती एक किलो गहु तर एक किलो तांदुळ असे दोन किलो धान्य तांदुळ १२ रुपये प्रती किलो तर गहु ८ रुपये प्रती किलो दराने मिळणार आहे. अशा सुचना तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये धान्य वितरणाच्या सुचना तालुका पुरवठा निरिक्षक कु.अंकीता वाघमुळे आणी पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन राजेश भंगाळे यांनी तालुक्यातील सर्व रेशन दुकांनांना दिले असून , मागील एक वर्षा पासुन शिधा पत्रीका असतांना ही कोरोनाच्या संकटकाळात धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या याची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतला असुन , नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे

 

Protected Content