भिलालीत ९६ लक्षच्या विकासकामांचे आ.अनिल पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भिलाली येथे आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या ९६  लक्षच्या विकासकामांचे आमदार  पाटील यांच्या हस्ते थाटात भूमीपूजन करण्यात आले.

 

आ. अनिल पाटील यांचे  गावात जल्लोषात स्वागत करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदारांनी मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा मांडून बहुतांश विकासकामे पूर्णत्वास आली असल्याचे सांगितले. तर बहुतांश विकासकामे प्रगतीपथावर असून गेल्या महिनाभरापासून कोट्यावधीच्या विकासकामांचे भूमीपूजन होऊन काम प्रत्यक्षात सुरूही झाले आहे. कोणत्याही गावावर अन्याय न करता समान न्यायाचे आपले धोरण असल्याची भूमिका आमदारांनी मांडली. यावेळी बाबूलाल पाटील, अविनाश लोटन पाटील (सरपंच), पी. के.पाटील, बाबुराव प्रतापसिंह गिरासे, हारसिंग गजमल गिरासे, रमेश राजाराम कोळी, उमेश रविदास माळी, भिकन अभिमान माळी, लखेसिंग रामसिंग गिरासे, सुनील भास्कर पाटील व सर्व भिलाली ग्रामस्थ उपस्थित होते.

 

या विकासकामांचे झाले भूमीपूजन

 

आमदार निधीतुन सभामंडप बांधणे रक्कम १५ लक्ष,

सामाजिक न्याय विभाग अंतर्गत गावात काँक्रिटीकरण करणे रक्कम १० लक्ष डी.पी.सी. अंतर्गत मराठी शाळेचा वॉलकंपाऊंड बांधणे,रक्कम २० लक्ष ,जलसिंचन मिशन अंतर्गत- गावात पाणीपुरवठा करणे हे काम टेंडर प्रोसेसला असून रक्कम रु ५१.१९  लक्ष असे एकूण रक्कम रुपये ९६.१९  लक्षच्या कामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले.

Protected Content