“माझ्याशी प्रेम कर” असे म्हणून विद्यार्थीनीचा विनयभंग

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील एका शाळेच्या गेटजवळ शाळकरी विद्यार्थींचा रस्ता आडवत माझ्याशी प्रेम कर असे म्हणत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल शहरातील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलगी ही बुधवारी १३ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी १०.३o वाजेच्या सुमारास साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या शिक्षणासाठी जात असतांना साने गुरूजी विद्यालया समोर दुचाकी आडवी लावून  लोकेश सुनिल महाजन रा. देशमुख वाडा यावल या तरुणाने  अल्पवयीन मुलीचा हात पकडून माझ्याशी प्रेम कर असे म्हणत तिचा विनयभंग केला.

या घटनास्थळी छेडखानी झालेल्या अल्पवयीन मुलीचा भाऊ या ठिकाणी आला व त्या तरुणास माझ्या बहीणीचे नांव का घेतले असे विचारले असता लोकेश महाजन याच्या दुचाकीच्या  मागे बसलेल्या कहैन्या देशमुख व वैभव देशमुख यांनी मुलीच्या भावास चापटाबुक्यानी मारहाण केली. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादी वरून तिन तरूणांविरूद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असुन घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करणार आहे .

Protected Content