एमआयडीसीतील सोमनाथ इंटरप्राईजेसच्या गोदामाला आग; १५ ते २० लाखांचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील सेक्टर ए-९७ येथील सोमनाथ इंटरप्रायजेसजवळील एका गोदामाला कचरा पेटवल्यानंतर त्याची चिंगी उडल्याने आग लागून कुट्टीच्या २०० गोण्यासह शेजारील मसाले, चिक्की व क्वाईल असे साहित्य जळून खाक झाल्याची घटना रविवारी ११ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. तब्बत १३ बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत १५ ते २० लाखांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव एमआयडीसी परिसरातील सेक्टर ए-९७ मध्ये असलेल्या सोमनाथ इंटरप्रायजेसजवळील एका गोदामामध्ये कुट्टी साठवून ठेवण्यात आली आहे. सोमवारी ११ डिसेंबर रोजी  रात्री १० वाजेच्या सुमारास आजूबाजूला कोणीतर कचरा पेटविला. काही वेळानंतर त्यातून एक चिंगी गोदामातील कुट्टीवर उडाली. त्यामुळे कुट्टीने पेट घेतला व पाहता-पाहता ही आग शेजारी असलेल्या  कंपनीतील मसाला, चिक्की गोदामाला लागली. त्यात या गोदामातील १५ ते २० लाखांचे साहित्य जळून खाक झाले. या सोबतच त्यालाच लागून असलेल्या एमडी हिट किंग कंपनी या इंडस्ट्रीयल हिटर तयार करणाऱ्या कंपनीमधील क्वाईल, लॅपटॉप, कपाट व इतर साहित्य जळून नुकसान झाले. आगीविषयी अग्नीशमन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर तेथे बंब पोहचले. पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र यासाठी एकामागे एक असे १३ बंबांद्वारे आग नियंत्रणात आणण्यात आली. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content