चौपदरीकरणासाठी अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्ता कायम ठेवावा- राजेंद्र चौधरी यांची मागणी

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्ग चौपदरीकरणातून रावेर व सावदा या शहरांना वगळू नये असे मागणीचे निवेदन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्ग चौपदरीकरणातून रावेर व सावदा या शहरांना वगळण्यात आल्याची दिसून आले आहे. सावदा शहर हे देशांमध्ये केळी निर्यातीसाठी प्रसिद्ध शहर आहे, असे असून सुद्धा जमीन भूसंपादनासाठी रावेर व सावदा या शहरांना वगळून ग्रामीणक्षेत्र मार्गे चौपदरीकरण महामार्ग मुक्ताईनगर तालुक्याला जोडला जात आहे. पूर्वीपासून अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्ग क्रमांक ४ असे वावरात आहे आणि ते फैजपूर सावदा, रावेर ते महाराष्ट्राची सीमा चोरवड यातून बराणपुर येथे जात असते शिवाय सावदा शहर, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात येथील राज्यांना जोडणारा महामार्गावरील महत्वाचे शहर आहे. सावदा, रावेर, फैजपूर परिसर व या शहरातील सर्व शेतकरी बांधव केळी उत्पादक व्यापारी म्हणून जगप्रसिद्ध आहे. असे असून सुद्धा दोन्ही शहर दळणवळण व व्यवसायापासून वंचित राहणार आहे होणारा हा अन्याय थांबवावा. त्यामुळे चौपदरीकरणाचा रस्ता हा रावेर, सावदा व फैजपूर या शहरातून करण्यात यावा. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन केले आहे.

Protected Content