लहान वाघोद्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला; परिसर सील

सावदा प्रतिनिधी । सावद्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या लहान वाघोदा ता. रावेर येथील एलआयसी कॉलनी परिसरातील एका रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. गावातील हा पहिला रूग्ण आढळून आल्याने एलआयसी कॉलनी परिसर सील करण्याचे काम सुरू आहे. या वृत्ताला गाते येथील उप आरोग्य केंद्राचे निरीक्षक डॉ. सारंग पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

सावदा येथून जवळच असलेल्या लहान वाघोदा येथील एलआयसी कॉलनीतील रहिवाशी ५२ वर्षीय रूग्ण गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद येथील रूग्णालयात उपरार्थ दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्याचा स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज त्यांचा अहवाल पॉझिटीव्‍ह आल्याचे उप आरोग्य केंद्राचे निरीक्षक डॉ. सारंग पाटील यांनी यांनी सांगितले. एलआयसी कॉलनीत रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने ग्रामसेवक शिवाजी सोनवणे, तलाठी चोपडे, सरपंच रवी कोलते आणि पोलीस पाटील राजेश कोलते यांच्यासह आरोग्य पथकातर्फे संपुर्ण परिसर सील करण्याचे काम सुरू आहे.

Protected Content