हिंगोणा येथील कोरोना संशयित महिलेचा सावद्यात मृत्यू

सावदा ता.रावेर (प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील हिंगोणा येथील कोरोना संशयित ७५ वर्षीय वृध्देचा आज सावदा येथील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, या महिलेस  कोरोना संशयित लक्षणे दिसून आल्याने सावद्यात खळबळ उडाली आहे.

रावेर व यावल तालुक्यात अद्यापर्यंत कोरोनामुक्त होता. मात्र १४ मे रोजी दोन जण पॉझिटीव्ह आढळून आल्याने यावल तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. रावेर तालुक्यातील सावदा व यावल तालुक्यातील सावदा हे दोन्ही गाव ३ किलोमीटर जरी अंतर असल्योन सावदा येथील नागरीकांच्या चिंता वाढल्या असतांनाच यावल तालुक्यातील हिंगोणा येथील ७५ वर्षीय वृध्देचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्वॅबचे नमून घेतले; सावद्यातच केले अंत्यसंस्कार
सदर ७५ वर्षीय वध्देला बसस्थानकाजवळील एका खासगी उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, या महिलेस  कोरोना संशयित लक्षणे दिसून आली होती. आज वृध्देचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. येथील डॉक्टरांनी रावेर ग्रामीण रूग्णालय ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.गणेश मराठे, मुख्याधिकारी सौरभ जोशी, सपोनि राहुल वाघ उपस्थित झाले. तर फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण रूग्णालयाचे पथक खासगी रूग्णालयात दाखल झाले. तातडीने मयत महिलेचे स्वॅब नमूने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. सावदा येथे महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

खासगी रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी क्वारंटाईन
खासगी रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सावदा पालिकेतर्फे जंतूनाशक फवारणी देखील करण्यात आली. दरम्यान मयत महिलेचे स्वॅब नमूने डॉ.बारेला व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी घेतले तर सदर नमूने धुळे येथे त्वरीत तपासणीसाठी पठविल्याचे येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.गणेश मराठे यांनी सांगितले. जोपर्यंत या मयत महिलेचे रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे. तर सावदा येथे याअगोदरच एक जण संशयित असल्याने एका हृदयरोग तज्ञ डॉक्टर यांना देखील कोरोनटाईन करण्यात आले आहे.

Protected Content