बोढरे येथे आढळला बेवारस मृतदेह

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे येथे अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथे ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आज दुपारी २:३० वाजताच्या सुमारास आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मयताची ओळख अद्याप पटलेली नसून या घटनेबाबत पोलिस पाटील राजेंद्र पाटील यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना कळविले आहे. काही क्षणातच ते घटनास्थळी दाखल होणार आहेत. त्यानंतर सदर मृतदेहाला चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात येणार आहे.

 

Protected Content