जळगाव येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

पाचोरा प्रतिनिधी । येथील माहेर व जळगाव येथील सासर असलेल्या विवाहीतेचा गेल्या काही वर्षांपासून पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. नियमित होणाऱ्या त्रासाला कंटाळुन अखेर सदर पिडीत महिलेने माहेरीच राहण्याचा व कायदेशीर काडीमोड घेण्याचा निर्णय घेऊन न्यायालयीन कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे.

न्यायालयात आपल्या विरुद्ध निकाल लागला तर कायदेशीर रित्या आपल्या मालमत्तेमधील काही भाग महिलेला द्यावा लागेल असे होऊ नये, यासाठी पिडीत महिलेकडे व तिच्या नावे कोणतीही स्थावर वा जंगम मालमत्ता नाही असे न्यायलायला भासविण्यासाठी पती व सासरच्या मंडळींनी वडिलोपार्जित मालमत्ता विकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावर महिलेने आक्षेप घेतला आहे. असे पीडित महिलेने माध्यमांशी बोलतांना सांगितले.

सदर महिला रा. सिंधी कॉलनी, राजाराम नगर, जळगाव, हल्ली मुक्काम सिंधी कॉलनी, पाचोरा जि. जळगाव यांचा विवाह जळगांव येथील संजय गुरुमुखदास रामचंदाणी यांचेशी झाला होता. विवाह झाल्यानंतर वैवाहिक जीवन सुरळीत सुरू होते. परंतु कालांतराने एकत्रित कुटुंब असल्याने पतीसह जसोदाबाई गुरुमुखदास रामचंदाणी (सासु), नरेश गुरुमुखदास रामचंदाणी (दिर), दिपा नरेश रामचंदाणी (देरानी), महेश गुरुमुखदास रामचंदाणी (दिर), भारती महेश रामचंदाणी (देरानी), राजेश गुरुमुखदास रामचंदाणी (दिर) व संजना राजेश ‌रामचंदाणी (देरानी) सर्व रा. सिंधी कॉलनी, जळगांव या सर्वांनी करिना रामचंदाणी हिची काही एक चुक नसतांना महिलेचा शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. पिडीत करिना मुलांकडे बघुन त्यांचे अत्याचार सहन करत राहिली. परंतु नियमित होत असलेल्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने आपल्या मुलांसह पाचोरा येथील वडिलांकडे माहेरी वास्तव्यास आली आहे.

दरम्यान, महिला ही सासरी (जळगांव) येथे नसल्याचा फायदा घेत पती संजय गुरुमुखदास रामचंदाणी व परिवारातील सर्वच सदस्यांनी वडिलोपार्जित मालमत्ता विकण्याचा प्रयत्न चालविला असुन त्यास हरकत आहे. सासरच्या मंडळींनी सर्वप्रथम जळगाव शहरातील वल्लभदास वालजी व्यापारी संकुल जळगाव, येथील गाळा क्रमांक – ३ हा कवडीमोल भावात विक्री काढला असुन याबाबत सदर महिलेची हरकत आहे. तसेच सततच्या या त्रासामुळे पिडीत करिना चे आई – वडीलांसह इतर समकक्ष सदस्यांनी या रामचंदाणी परिवाराशी नातेसंबंध न ठेवण्याचा प्राथमिक निर्णय घेतला असून याबाबत दोघे परिवारात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली आहे.

सद्यस्थितीत दोघेही परिवारात न्यायप्रविष्ट बाब सुरू असल्याने या न्यायालयीन प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया व निकाल लागेपर्यंत त्यांच्या मालकीच्या सर्वच मालमत्ते मध्ये करिणाचा त्यांच्या बरोबरीचा वाटा असल्याने सदर गाळा करिनाच्या इच्छेविरुद्ध विकण्यास काढलेला असल्याने याला करिणाची हरकत आहे. तरी कुणी हा गाळा व या परिवाराची इतर प्रॉपर्टी खरेदी, विक्री प्रक्रियेत भाग घेतल्यास पुढील कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार असे करिना रामचंदाणी यांनी माध्यमांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Protected Content