इंद्रदेव नगरात चोरट्यांनी लांबविले तीन मोबाईल

sambhaji nagar chori

जळगाव प्रतिनिधी । उघड्या खिडकीतून तीन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना पिंप्राळ्यातील निसर्ग कॉलनी येथे घडली. याबाबत रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र नारायण हरिमकर (वय-59) रा. इंद्रदेव नगर, निसर्ग कॉलनीजवळ, पिंप्राळा हे जैन व्हॅलीमध्ये फोटोग्राफर म्हणून कामाला आहे. 20 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास सर्व जण जेवण करून झोपले होते. मुलागा तुषार हरिमकर यांने त्याचा लिनीओ मोबाईल चार्जिंगसाठी खिडकीजवळ लावलेला होता. तर मुलगी निकीताचे देखील दोन मोबाईल खिडकीत त्याच ठिकाणी ठेवलेले होते. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री खिडकी उघडी असल्याचा फायदा घेत खिडकीतून तिन मोबाईल व मोटारसायकलच्या चाव्या चोरून नेले. हा प्रकार पत्नी रंजना यांच्या लक्षात आल्याने उघडकीस आला आहे. याबाबत राजेंद्र हरिमकर यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content