‘या’ कारणामुळे बीसीसीआयला सतावते भारतीय खेळाडूंची चिंता

cricek

अँटिग्वा वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव्हन स्मिथ ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात जायबंदी झाला. इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने टाकलेला बाऊंसर स्मिथच्या मानेवर आदळला आणि त्यानंतर ऑसी खेळाडूला मैदान सोडावे लागले. स्मिथ सोबत या घडलेल्या घटनेमुळे बीसीसीआयला खेळाडूंची चिंता सतावत आहे.

याबाबत माहिती अशी की, स्मिथच्या दुखापतीनंतर नेक गार्ड घालावे की नाही, ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. कराही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्याच फिल ह्युजेसलला मानेवर चेंडू आदळल्याने प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर स्मिथसोबत घडलेल्या प्रसंगाने पुन्हा क्रिकेट वर्तुळात फलंदाजांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेचे उधाण आले आहे. ऑस्ट्रेलिया मंडळाने तर त्यांच्या खेळाडूंना नेक गार्ड घालण्याची सक्ती केली आहे. बीसीसीआयलाही भारतीय खेळाडूंच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. त्यांनी भारतीय खेळाडूंना नेक गार्डचे महत्त्व समजावून सांगण्यात येणार आहे.

Protected Content