आ. किशोर पाटील यांची उद्यापासून मतदार संघात ‘जन-आशीर्वाद यात्रा’

kishor patil

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील शिवसेनेचे लोकनेते कार्यसम्राट आ.किशोर पाटील यांची उद्या दि. 22 ऑगस्ट पासून जन-आशिर्वाद यात्रेस सुरुवात होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आ.किशोरआप्पा पाटील यांची जन-आशिर्वाद यात्रेची रूपरेषा पुढीलप्रमाणे असणार आहे. दि. 22 ऑगस्ट गुरूवार रोजी सकाळी 8:30 वाजता लासुरेमध्ये तर सायंकाळी 5:30 वाजता खेडगाव, 7:00 वाजता कोळगाव, सायंकाळी 8:30 वाजता पिंप्रीहाट राहणार आहेत. दि. 23 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी होळ येथे कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता पथराड तर सायंकाळी 7:00 वाजता जुआर्डी, 8:30 वाजता आडळसे असणार आहेत. दि. 24 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 8:30 वाजता आंबे वडगावात तर सायंकाळी 5:30 वाजता पांढरद, 7:00 वाजता पिचर्डे आणि रात्री 8:30 वाजता बात्सर राहणार आहे. दि. 25 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी सत्कार समारंभ होणार असून सायंकाळी 6:30 वाजता गुढे येणार आहेत. अशा प्रकारे आ. किशोर पाटिल यांचे नियोजन राहणार आहे.

 

Protected Content