मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे कुटुंबाशी आमचे अतिशय आत्मीयतेचे संबंध असून उध्दव ठाकरे हे आपल्या मोठ्या भावासारखे असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रीया सुळे यांनी केले. आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी ठाकरे आणि पवार कुटुंबातील संबंधांना उजाळा देत आजच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले.
राज्यातील सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यात आल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमिवर, आज खासदार सुप्रीया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात ते म्हणाले की, ठाकरे कुटुंबाशी आमचे आधीपासून निकटचे संबंध आहेत. यात विशेष करून बाळासाहेब आणि मांसाहेब यांच्याशी माझे भावनिक संबंध होते. तर उध्दव ठाकरे हे मला मोठ्या भावासारखे आहेत. शिवसेनेचा विचार केला असता, हा पक्ष म्हणजे एक कुटुंब असून उध्दवजी यांनी एका कुटुंबासारखा आपला पक्ष चालविला असून आज ते काही घडतेय ते अतिशय दुर्दैवी आहे.
सुप्रीया सुळे यांनी आज सध्याच्या राजकीय स्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, इतकी वर्षे एका पक्षाशी निष्ठा बाळगलेल्या आमदारांनी अशा प्रकारे बंड करणे हे अतिशय दुर्दैवी असेच आहे. नाती ही जपायची असतात. आपले कुणाशी मतभेद असू शकतात. मात्र चर्चेतून सर्व मार्ग निघू शकतो. यामुळे बंडखोर आमदारांनी देखील उध्दव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्याची गर असल्याचेही त्यांनी सांगितले.