“भाजपाने घोडेबाजार करत निवडणूक जिंकली” : अमोल मिटकरी

मुंबई वृत्तसंस्था | नुकत्याच संपन्न झालेल्या नागपूर, अकोला-बुलडाणा आणि वाशिम विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे मात्र या विजयानंतर भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच सत्र सुरू झालं आहे.

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर “भाजपाने घोडेबाजार करत निवडणूक जिंकली” या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानाला उत्तर देतांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला तर ईव्हीएम मशीन चांगलं असतं मात्र आसाममध्ये भाजप जिंकले तर ईव्हीएम मशीनमध्ये प्रॉब्लेम असतो. हे जिंकले तर तत्वज्ञान जिंकतं आणि आम्ही जिंकलो तर घोडेबाजार जिंकला असा तर्क देतात” असं उत्तर दिलं

यावर “गुप्त मतदान पैशांनी विकत घेता येते अशी चर्चा लोकांमध्ये आहे” असं विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी घोडेबाजार करत भाजपाने पैशांच्या माध्यमातून निवडणूक जिंकली अशी अप्रत्यक्ष टीका केली. मिटकरींच्या या विधानावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत “व्वा…व्वा…मिटकरी लैच बोलायला लागले” असं म्हणत “आमच्याकडे दोन नंबरचा पैसा नाही, सत्य काय आहे हे लोकांना माहीत आहे” असे विधान केले.

Protected Content